मुंबई ते लंडन केवळ दहा आठवड्यात: या ७३वर्षीयांने रस्तेमार्गे सफर केली १९ देशातून!
अलिकडेच बद्री बलदवा यांनी लंडनची स्वारी रस्त्याने १९ देशातून सफर करून पूर्ण केली, त्यांना त्यांच्या बीएमडब्ल्यूएक्स५ मधून त्यासाठी ७२ दिवस लागले. यातून त्यांनी हेच दाखवून दिले की, जग पहायचे असेल तर या रस्त्यानेच, सारे धोके पत्करून! परंतू खरे आश्चर्य तुम्ही त्यावेळी व्यक्त कराल की, ही सफर त्यांनी वयाच्या ७३व्या वर्षी आणि आपल्या धर्मपत्नी आणि दहा वर्षांच्या नातीसोबत पूर्ण केली आहे. यातून त्यांच्या या सफरीचा सार थरार आणि मौज दोन्हीची कल्पना आपणांस करता येवू शकेल. त्यांच्या महत्वाकांक्षा आणि जिद्दीच्या तसेच जिगरबाजपणाच्या गुणांचे तुम्हाला कौतूक वाटेल. धाडसी प्रवासी, बद्री यांना त्यांच्या पारपत्रावर ६५ देशांचे व्हिसा शिक्के आहेत याचा अभिमान आहे.
हे सारे सुमारे सात वर्षापूर्वी सुरू झाले, ज्यावेळी हे जोडपे लंडनहून मुंबईला हवाईमार्गे परत येत होते, बद्री यांना इच्छा झाली की, या मार्गावर प्रेक्षणीय काय आहे ते भटकत यावे आणि जवळून पहावे. व्यवसायाने पोलाद निर्यातदार आणि लेखा परिक्षक असलेल्या बद्री यांनी सक्रीयपणे याबाबत विचार करण्यास सुरूवात केली, मात्र त्यांच्या या तीन खंडातील रस्ते मार्ग करायच्या प्रवासाच्या कल्पनेला घरातील कुणी गंभीरतेने घेतले नाही. मात्र ते हटले नाहीत आणि वर्षभराच्या तयारीनंतर त्यांनी मार्च २०१७मध्ये मुंबईहून यात्रा सुरू केली.या तिघांनी इफांळ येथे जावून तेथे आपल्या सहकारी आणि विदेशी मित्रांना सोबत घेतले. ते दररोज चारशे किमी प्रवास करत. एकदा मात्र त्यांनी एका दिवसात ९३० किमीचा मोठा ट्प्पा पार केला होता.
पूर्वोत्तर राज्यातून भारताची सीमा पार केल्यानंतर लगेचच बद्री यांनी फेसबूक वर लिहिले की, “ आम्ही सीमापार करत आहोत, शेवटी हे घडले आहे. आमच्यापैकी कुणालाच विश्वास बसत नाही की आम्ही भारताची सीमा ओलांडून कारने निघालो आहोत.आज आमचा प्रवास युरोपच्या दिशेने सुरू झाला आहे.”
खडतर विदेशी प्रवास हा काही त्यांना नेहमीचा नव्हता, आणि हा काही त्यांचा रस्तेमार्गे पहिलाच प्रवासही नव्हता. तीस वर्षांपूर्वी त्यांनी मुंबई ते बद्रीनाथ असा प्रवास केला होता. त्यांनी बेटांवरूनही प्रवास केला होता, आणि ९० अंश उत्तरेला जाणारे पहिलेच भारतीय प्रवासी असल्याचा दावा देखील ते करतात.
या यात्रेतील अनुभव कथन करताना त्यांनी काही वृत्तपत्राना सांगितले की, “ आम्ही याच समजाने निघालो होतो की चीन आणि रशियातील लोक भारतीय असल्याने आमचे काही स्वागत करणार नाहीत. मात्र आमचे सा-या ठिकाणी स्वागतच झाले.”
ही यात्रा सा-या ठिकाणी सुकरच झाली अपवाद होता तो
काही देशात राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी हॉटेल मिळाले नाहीत किंवा
काही ठिकाणी सुरक्षेचा धोका पत्करावा लागला. मात्र सा-या देशांत त्यांना
महत्वाचे काय दिसले असेल तर, नागरी जबाबदारीचे भान आणि स्वच्छता हेच होय.
जरी हे जोडपे आता त्यांच्या नव्या यात्रेची योजना तयार करत असले तरी, बद्री यांची खरी इच्छा त्यांच्या पत्नी सोबत अंतराळात चालत जाण्याचीच आहे!
Ravi Bhosale
जरी हे जोडपे आता त्यांच्या नव्या यात्रेची योजना तयार करत असले तरी, बद्री यांची खरी इच्छा त्यांच्या पत्नी सोबत अंतराळात चालत जाण्याचीच आहे!
Ravi Bhosale