Wednesday, 19 April 2017

बेघर झालेला मुलगा झाला उद्योजक, लेखक त्याव्यतिरिक्त रस्त्यावर राहणा-या मुलांना करत आहे मदत...!

बेघर झालेला मुलगा झाला उद्योजक, लेखक त्याव्यतिरिक्त रस्त्यावर राहणा-या मुलांना करत आहे मदत...!
पाच वर्षाच्या वयात ते घरातून पळाले होते, त्यानंतर त्यांनी भीक मागीतली, चोरीचक्कारी केली, बूटपॉलिश करून आयुष्याला पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र आज ते आत्मनिर्भर आहेत, लेखक आहेत आणि ज्या मुलांचे लहानपण अंधारात हरवलेले आहे, त्यांच्यासाठी काम करत आहेत. ३५ वर्षांचे अमीन शेख मुंबईमध्ये लवकरच,


‘बॉम्बे टू बार्सिलोना’ नावाने एक कँफे उघडणार आहेत, जे केवळ रस्त्यावर राहणा-या मुलांना आपल्या पायावर उभे होण्यास मदतच करणार नाही तर, तेथे मिळणारे जेवण लोकांच्या प्रकृतीचा विचार करून देण्यात येईल.
अमीन यांचे लहानपण खूपच हलाखीत व्यतीत झाले होते. जेव्हा ते पाच वर्षाचे होते, तेव्हापासून त्यांनी एका चहाच्या दुकानावर काम करण्यास सुरुवात केली होती. जेथे त्यांना प्रत्येक दिवशी दोन रुपये वेतन मिळत होते. एके दिवशी हातातून सटकून चहाचे भांडे आणि काही ग्लास जमिनीवर पडून तुटले. तेव्हा त्यांनी विचार केला की, ते घरी जातील तेव्हा त्यांचे आई-वडील त्यांना मारतील आणि जर चहाच्या दुकानदाराला त्यानी ही गोष्ट सांगितली तर, तो देखील मारेल. त्यामुळे त्यांनी सर्व सोडून पळण्याचा निर्णय घेतला.


अशाप्रकारे ते मुंबईच्या दादर रेल्वेस्टेशनवर येऊन रहायला लागले. जेथे त्यांनी पाहिले की, त्यांच्या सारखीच अनेक अशी मुले आहेत, जी घरातून पळून आली आहेत आणि ती देखील तेथे राहतात, व भीक मागून आणि कच-यात पडलेले अन्न वेचून खात आहेत आणि जिवंत आहेत. याच प्रकारे जवळपास तीन वर्षापर्यंत गरीबी, लहान मोठे काम करणे आणि बागेत रात्र घालविण्यासाठी मजबूर अमीन यांच्यावर एके दिवशी एका ‘स्नेहसदन’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेतील सिस्टरची नजर पडली आणि त्या त्यांना त्यांच्या बहिणीसोबत आपल्या संस्थेत घेऊन आल्या. जेथे पहिल्या पासूनच अनेक अशी मुले रहात होती, जी आपल्या घरातून पळून आली होती. तेव्हा अमीन यांचे वय केवळ आठ वर्ष होते. याचप्रकारे त्यांनी येथे राहून शिक्षण घेतले. अमीन यांच्या मते, “मला पहिल्यांदा जाणीव झाली की, घर काय असते, घरातल्या लोकांकडून मिळणारे प्रेम कसे असते. मी स्नेहसदनमध्ये राहून शिक्षण घेतले, मात्र मी शिक्षणात जास्त हुशार नव्हतो, त्यामुळे मी केवळ सातवीपर्यंतच शिक्षण घेऊ शकलो.” या प्रकारे १८वर्षाचा होताच त्यांनी चालकाचा परवाना घेतला, ज्यानंतर त्यांनी ‘स्नेहसदन’ सोबत चांगले संबंध असणा-या एका व्यक्तीकडे चालकाची नोकरी करण्यास सुरुवात केली.


हिम्मत, मेहनत आणि प्रामाणिक असलेल्या अमीन यांच्या कामापासून खुश होऊन, त्यांच्या मालकाने त्यांच्यासाठी एक ट्रँवल कंपनी उघडली आणि ज्याचे नाव ‘स्नेह ट्रँवल’ ठेवले. मात्र ‘‘स्नेह ट्रँवल’ची स्थापना करण्यापूर्वी त्यांना बार्सिलोना जाण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी पाहिले की, कुठलाही मुलगा रस्त्यावर गरीबीचे जीवन व्यतीत करत नाही आणि येथील लोक खूप जिंदादील आहेत. ही गोष्ट त्यांना आवडली. ज्यानंतर त्यांनी निश्चय केला की, ते आपल्या देशात परतून रस्त्यावर राहणा-या मुलांसाठी काहीतरी काम करतील. त्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यावर एक पुस्तके लिहिले, ज्याचे नाव “बॉम्बे लाइफ इज लाइफ: आई बिकॉज ऑफ यू” आहे. विशेष बाब ही आहे की, अमीन या पुस्तकाचे केवळ लेखक नसून प्रकाशक देखील आहेत. हे पुस्तक आठ  भाषेत छापण्यात आले आहे. यात इतालवी आणि कँटलन भाषा देखील सामील आहे. त्यांच्या मते, आतापर्यंत त्यांच्या पुस्तकाच्या  आठ हजार प्रती विकल्या गेल्या आहेत आणि हे पुस्तक ई- बुक स्टोर वर देखील उपलब्ध आहे. अमीन सांगतात की, त्यांनी केवळ हे पुस्तक लिहिलेच नाही तर, त्याला छापले आणि विकण्याचे काम देखील केले. अमीन यांच्या मते, या पुस्तकातून मिळणारे पैसे, ते रस्त्यांवर राहणा-या मुलांच्या विकासावर खर्च करू इच्छितात. त्यासाठी ते ‘बॉम्बे टू बार्सिलोना’ नावाच्या प्रकल्पावर काम करत आहेत. अमीन यांच्या मते, हे एक कँफे हाउस असेल, जेथे काम करणारे लोक रस्त्यावर राहणारे मुलेच असतील, जे आता मोठे झाले आहेत. जे येथे राहून केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूतच बनत नाहीत तर, या कँफेमध्ये होणा-या फायद्यातून त्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च केला जाईल, जे काही कारणांमुळे रस्त्यावर राहण्यासाठी मजबूर आहेत. अमीन यांची इच्छा आहे की, रस्त्यावर राहण्यासाठी मजबूर मुलांना केवळ सुरक्षित वातावरणच नाही तर, त्यांच्या चांगल्या शिक्षणावर लक्ष देण्याचे गरज आहे. अमीन सांगतात की, त्यांनी केवळ सातवीपर्यंतच शिक्षण केले आहे, मात्र जितकी चागली ते हिंदी बोलतात, त्याहून अधिक ते इंग्रजीत बोलणे पसंत करतात.


अमीन यांचे म्हणणे आहे की, “रस्त्यावर राहणा-या मुलांचे नशीब माझ्यासारखे नसते. मला आयुष्यात खूप काही मिळवायचे आहे, त्यासाठी मी खूप मेहनत करत आहे. मी आज देखील रस्त्यावर राहणारा माणूस आहे आणि मी रस्त्यावर राहणा-या मुलांसाठी काम करत आहे. माझी अशी अजिबात इच्छा नाही की, या मुलांना त्रास भोगावा लागेल, जो त्रास मी आपल्या आयुष्यात सहन केला आहे. “अमीन यांच्या ‘बॉम्बे टू बार्सिलोना, नावाच्या महत्वाकांक्षी योजनेमार्फत ते आपल्या कँफेला युवा कलाकारांसाठी एक मंच म्हणून वापरू इच्छितात. जेथे ते केवळ आपल्या कलेचेच नव्हे तर, आपल्या प्रतिभेचा परिचय दुस-या लोकांसमोर करू शकतील. म्हणूनच त्यांचे स्वतःचे केवळ संकेतस्थळच नाही तर, फेसबुक, ट्वीटर आणि दुस-या सोशल मिडियावर ते सलग सक्रीय  राहतात. ३५ वर्षाचे असलेल्या अमीन यांनी अद्यापही विवाह केला नाही. त्यांचे मत आहे की, जोपर्यंत ते दुस-यांची जबाबदारी घेण्यासाठी पात्र होत नाहीत, तोपर्यंत ते विवाह करणार नाहीत. असे असूनही त्यांनी आपल्या लहान बहिणीला शिकवून इतके सक्षम केले आहे की, ती आपल्या पायावर उभी राहू शकेल.
सध्या अमीन यांना ‘बॉम्बे टू बार्सिलोना’ नावाच्या आपल्या प्रकल्पासाठी गुंतवणूकदारांचा शोध आहे. त्या व्यतिरिक्त त्यांची इच्छा आहे की, ते जे पण काम करतील त्याचा फायदा कँफेला मिळावा, जेणेकरून रस्त्यावर राहणा-या मुलांपर्यंत मदत पोहोचू शकेल.
यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या आपली माणसं Blog ला  Follow करा

लेखक : गीता बिश्त
अनुवाद : किशोर आपटे

आपली माणसं

No comments:

Post a Comment

Popular Posts