अभिनेत्री आलिया भट्ट हिला लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार-2017 मधील आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर आॅफ द इयर (महिला) कॅटेगरीतील पुरस्काराने आलियाला गौरवण्यात आले
इयर पुरस्कार-2017 मधील आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर आॅफ द इयर (महिला) कॅटेगरीतील पुरस्काराने आलियाला गौरवण्यात आले. पवन गोएंका यांच्या हस्ते हा पुरस्कार तिला प्रदान करण्यात आला.
सिनेमाचं बाळकडू तिला घरातूनच मिळालं. वडिल प्रसिद्ध दिग्दर्शक, काका प्रसिद्ध निर्माते, बहिण पूजा भट्ट आणि आई सोनी राजदान प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री. असं असताना तिला बॉलिवूडची दारं सहज खुली होतील,असं कुणालाही वाटेल. वडिलांकडे आपल्यासाठी सिनेमा बनवण्याचा आग्रह करुन बॉलिवूडमध्ये एंट्री मारण्याचा सोपा मार्ग तिच्याकडे होता. मात्र तसं न करता तिने दुस-या दिग्दर्शकाच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. यशाचा सोपा मार्ग न स्वीकारता खडतर मेहनत करुन अभिनयात स्वत:ला सिद्ध करणे तिला महत्त्वाचे वाटले. अशी बॉलिवूडची अभिनेत्री आणि तरुणाईची लाडकी स्टार म्हणजे आलिया भट. ‘स्टुडंन्ट आॅफ द इयर’ बनून तिने करण जोहरच्या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. आपल्या पहिल्याच सिनेमातून तिने रसिकांवर विशेषत: तरुणाईवर जादू केली. त्यानंतर आलियानं मागे वळून पाहिले नाही. एकाहून एक सरस भूमिका साकारत तिने आपल्या सिनेमा क्षेत्रातील प्रवास सुरु ठेवला. ‘हायवे’, ‘टू स्टेट्स’सारख्या सिनेमातील भूमिकांमुळे तिच्यातील अभिनेत्री आणखी खुलली. तिच्या अभिनयावर रसिकांसोबत समीक्षकसुद्धा फिदा झाले. त्यामुळेच की काय ‘उडता पंजाब’ सिनेमात साकारलेल्या भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. याशिवाय ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’,‘शानदार’, ‘कपूर एंड सन्स’, ‘डिअर जिंदगी’ या सिनेमातील तिच्या भूमिकाही विशेष लक्षवेधी ठरल्या. अभिनयासोबतच तिला सूरांचीही उत्तम जाण आहे. ‘हायवे’ आणि ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ सिनेमात तिने तिच्या सूरांची जादूसुद्धा दाखवली आहे. त्यामुळेच या लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार-2017 मधील आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर आॅफ द इयर (महिला) कॅटेगरीतील पुरस्काराने आलियाला गौरवण्यात आले.

No comments:
Post a Comment