भारतात महामार्गावर कोणतेही दारूचे दुकान नाही: धन्यवाद या माणसाच्या लढ्याला!
ऑक्टो १९९६ मध्ये २६ वर्षीय हरमन सिंग संधू आणि त्यांचे तिघे मित्र हिमाचल प्रदेशातील तळ्याला भेट देवून चंदीगढला त्यांच्या मार्गाने जात होते. त्यांच्या मार्गात आलेल्या लिओपोर्ड कबच्या मागच्या बाजूने नियमित रस्ता सोडून अंतर्गत रस्त्याने जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला जेणेकरून जंगली जनावरे पाहायला मिळतील. ते ज्या वाहनातून जात होते त्याचे नियंत्रण सुटले आणि ते रस्ताच्या बाहेर गेले आणि त्यांची कार खोल दरीत पडली. जरी त्यांचे मित्र सुखरुप वाचले तरी त्यांना जबर मार लागला आणि कण्याला दुखापत झाल्याने ते पंगू झाले.
हरमन यांनी सांगितले की, “ आम्ही सारे बसलो होतो, मी मागच्या बाजुला होतो, आणि कारने अनेकदा गटांगळ्या खाल्ल्यानंतर ६०-७० फूट खोल दरीत चाकांवर पडली. मी अजूनही कारमधल्या माझ्या त्या अवस्थेची अनुभूती अगदी स्पष्टपणे आणि तपशिलात घेतो”.
या जीवघेण्या अपघातानंतर, हरमन यांच्या दोन्ही पायांच्या संवेदना नाहीश्या झाल्या. आणि आजही ते व्हिलचेअरवर फिरण्यास बाध्य झाले आहेत. चंदीगढ मध्ये दोन वर्षे रुग्णालयात घालविल्यानंतर त्यांनी मागील तपशील शोधले आणि अशा प्रकारचे अपघात रस्त्यावर का होतात याचा अभ्यास केला. रस्ते अपघातांबाबत जागृती पसरविण्याचे काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यासाठी वेगवेगळी अभियाने घेण्यास सुरुवात केली. लोकांना रस्ता सुरक्षा या विषयावर जागरूक करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यावेळचे परिवहन अधिक्षक अमिताभसिंग धिल्लन यांची भेट झाल्यावर हरमन यांनी आपल्या लढ्याची दिशा बदलली.
एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, “ धिल्लन यांनी सांगितले की संकेतस्थळाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचू शकतो, त्यामुळे सुरक्षितपणे वाहने कशी चालविता येतील तेही लोकांना सांगता येते, त्यामुळे मी चंदीगढ वाहतूक पोलिसांसाठी एक संकेत स्थळ तयार केले. त्यासाठी मी तयार नव्हतो इतक्या लोकांचा प्रतिसाद मला केवळ तीन महिन्यात मिळाला, लाखा पेक्षा जास्त लोक संकेतस्थळाला भेट देतात!”.
काही महिन्यात हरमन यांनी स्वत:ची सेवाभावी संस्था सुरु केली. ‘अराइव सेफ’ जिचा उद्देश केवळ रस्ता सुरक्षा बाबत जागरूकता निर्माण करणे हाच आहे. हे सारे करत असतानाच त्यांनी जागतिक आरोग्य संस्था आणि संयुक्त राष्ट्र संस्था यांच्या सोबतही याच विषयावर काम करण्यास सुरुवात केली. या काळात त्यांनी वाहतूक पोलिसांसोबत बराच वेळ घालविला आणि त्यांच्या लक्षात आले की दारू पिऊन वाहने चालविल्याने सर्वाधिक अपघाती मृत्य़ू होतात.
ते सांगतात, “ भारतीय रस्त्यावर प्रत्येक चार मिनीटाला एक माणूस अपघातात मरतो, जे जागतील सर्वाधिक प्रमाण आहे. मागील वर्षी १४६१३३ लोक रस्ता अपघातात दगावले आहेत ज्यात अल्कोहोल हे महत्वाचे कारण समोर आले आहे. मी महामार्गावरच्या दारूच्या दुकांनाची माहिती घेतली. याशिवाय उत्पादन शुल्क विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मी अनेक माहितीच्या अधिकारात अर्ज केले आणि याबाबत माहिती घेतली. मला वाचून धक्का बसला पानीपत ते जालंधर या २९१ किमीच्या महामार्गावर १८५ दारूची दुकाने होती. म्हणजे प्रत्येक १.५ किमीवर एक!”
हरमन यांनी यावर पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, आणि मागणी केली की महामार्गावरची ही दुकाने बंद करावी. मार्च २०१४ मध्ये यावर निकाल आला, पंजाब आणि हरियाणा मध्ये हजार दारू दुकाने बंद झाली. तरीही समाधान झाले नाही मग सर्वोच्च न्यायालयात याचिका केली. दोन राज्य सरकारांनी त्याला आक्षेप घेतला आणि ही दुकाने बंद झाल्यास मोठा महसूली तोटा होतो असे सांगितले त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगन आदेश दिला.
त्यानंतर त्यांचा तपशिल आणि माहिती घेतल्यावर सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, “ मानवी जीवन अमुल्य आहे, रस्ते वाढत आहेत आणि ते या देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे. सामान्य माणसांच्या जीवनावर अपघाताचे विपरीत परिणाम होतात, त्यामुळे देशाच्या आर्थिक समृध्दीसाठी हा देश अपघांताची राजधानी होता कामा नये, दारूची दुकाने सहजपणे उपलब्ध झाल्याने अपघातांची संख्या वाढते त्यामुळे रस्ता सुरक्षा लक्षात घेवून वाहकांना सहजपणे दारू मिळणार नाही याची काळजी घेणे योग्य ठरते त्यामुळे त्यांना आणि प्रवास करणा-यांना सुरक्षा मिळू शकते”.
बरीच प्रतिक्षा केल्यावर डिसें. २०१६मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सा-या महामार्गावरील दारूच्या दुकानांना परवानगी नाकारली आहे, न्यायालयाने सांगितले की ३१मार्च२०१७ नंतर या दुकांनाचे परवाने नुतनीकरण होणार नाही.
या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करताना हरमन यांनी लाखो लोकांचा जीव वाचल्याचे मत व्यक्त केले. चार वर्षांचा प्रदीर्घ लढा देवून हरमन सिंग संधू यांनी देशाच्या लोकांना खरोखर जीवदान दिले आहे, असामान्य कार्य केले आहे. जो माणूस स्वत:च्या पायाने चालू शकत नाही त्याने महामार्गावर आपल्या सहकार्यांसोबत जावून कोणतेही दारुचे दुकान सुरु राहू नये याची काळजी घेतली.
-आपली माणसं
-आपली माणसं
No comments:
Post a Comment