Wednesday, 26 April 2017

पडद्यामागचा किंगमेकर सभागृहात जाणार

पडद्यामागचा किंगमेकर सभागृहात जाणार

अविनाश महागावकर अष्टपैलू व्यक्तिमहत्व
      उंच बहरून आलेलं झाड व्हायचं असेल तर मातीत पुरून घ्यावं लागतं. आणि जे पुरून घेतात ते निश्चित झाड होतात। अविनाश महागावकर हे व्यक्तिमत्व मातीत पुरून ऊगवलेलं झाड आहे. कोणत्याही पदाची माळ कधीच गळ्यात नाही, मिळणारा मान, सन्मान आणि प्रतिष्ठा याला हुरळून न जाता कार्यकर्ता म्हणून काम करताना जवळून पाहिलं. भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता, लोकमंगल फाउंडेशनचे संचालक आणि सहकारमंत्री श्री. सुभाष (बापू) देशमुख यांची सावली म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. शहाजी (भाऊ) पवार यांच्या सोबतीनं प्रामाणिक काम करणारा नेताच पण कार्यकर्ता समजणारा एक दिलदार माणूस.
        सामान्य कार्यकर्त्याला खांद्यावर हात ठेवून आदबीनं चौकशी करत संवाद साधताना पाहिलं. कोणत्याही प्रश्नावर तत्काळ तोडगा काढणं ही तर खासियत आहे. सामाजिक कार्याची बैठक गेली अनेक वर्षे पक्की केल्यानंतर आज सोलापूर महानगरपालिकेत भाजपा स्वीकृत सदस्य म्हणून जात आहेत.
       सामाजिक कार्याची तळमळ आणि सोलापूरच्या विकासाचा ध्यास यातून लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून व बापूंच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम राबविले. ही मोठी माणसं उभा राहताना सोबत अनेक माणसांना हात देतात म्हणून ती माणसं मोठी होतात.
        अविनाश दादा सभागृहात जाल तेव्हा निश्चित सोलापूरच्या वैभवात भर टाकणाऱ्या गोष्टी व विकास साधाल यात शंका नाही. पुढील कारकीर्दीसाठी मनःपूर्वक अनेकानेक शुभेच्छा।
एका अष्टपैलू कार्यकर्त्याचा व पडद्यामागच्या किंगमेकरचा हा सन्मान सर्वांना आनंद देणारा आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts