Thursday 18 May 2017

संभाजीराजेंच्या पाठवुराव्यातून प्राचीन व वारसा वास्तू संदर्भात पंतप्रधानांनी घेतला ऐतिहासिक निर्णय...

संभाजीराजेंच्या पाठवुराव्यातून प्राचीन व वारसा वास्तू संदर्भात पंतप्रधानांनी घेतला ऐतिहासिक निर्णय... लवकरच देशभरात अंमलबजावणी सुरु..... (हे कार्य जरूर शेअर करा....)
प्राचीन व वारसा वास्तू (संरक्षण) कायदा, १९५८नुसार (Ancient Monuments and Archaeological Sites Remains Act, 1958) घोषित केलेल्या संरक्षित वास्तूंच्या परिसरामध्ये कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यास निर्बंध सध्या देशात आहेत.


या सरसकट निर्बंधांमुळे केंद्र सरकारची सार्वजनिक हितांची अनेक अत्यावश्यक व उपयुक्त कामे करण्यास अडथळा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कायद्यामध्ये बदल करून अत्यावश्यक स्वरूपाची बांधकामे करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.   
मध्यंतरी संभाजीराजेंनी पंतप्रधानांना कोल्हापुरातील शिवाजी पुलाच्या तातडीच्या दुरुस्ती संदर्भात भेटले होते... त्या अनुषंगाने राजेंच्या पाठपुराव्याने देशातील सर्वच रखडलेल्या कामांना पंतप्रधानांनीं न्याय दिला....
प्राचीन आणि वारसा वास्तू (संरक्षण) कायदा, १९५८मध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवार, दि. १७ मे २०१७रोजीच्या बैठकीमध्ये घेतला. त्यासाठीचे दुरुस्ती विधेयक लवकरच संसदेमध्ये सादर केले जाईल.
वारसा वास्तूंच्या प्रतिबंधित परिसरामध्ये फक्त आणि फक्त, अत्यावश्यक सार्वजनिक हित लक्षात घेऊन अपवादात्मक परिस्थितीमध्ये बांधकामांना परवानगी देण्याचा अधिकार या दुरुस्तीमुळे केंद्र सरकारला मिळाला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने संमत केलेले बदल पुढीलप्रमाणे :
१)  कायद्याच्या कलम २ मध्ये सार्वजनिक हिताच्या कामांच्या (पब्लिक वर्क्स) नव्या व्याखेचा समावेश केला जाईल.
२)  कलम '२० ए' मध्ये आवश्यक ते बदल करून वास्तूंच्या प्रतिबंधित परिसरामध्ये केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागाला अथवा खात्याला केंद्र सरकारची परवानगी घेऊन बांधकाम करता येईल.
३)  कलम २० ('आय') मध्ये ('ईए') हे नवे उपकलम घातले जाईल.
              पार्श्वभूमी
कोल्हापूरात शिवाजीपूल म्हणजे जिव्हाळ्याचा विषय कोल्हापूर व कोकण यांना जोडणारा महत्वाचा दुवा. या पुलाला १५०पुर्ण झाल्याने त्याला पर्यायी पुल बांधण्यात आला पण पुरातत्व खात्याच्या जाचक आटीमुळे  तो पूल अर्धवटच राहीला.
हा पूल  पुर्ण करण्यासाठी कल्चर डिपार्टमेंट चे महेश शर्मा यांनी एतिहासिक वास्तू पासून १००मीटर पर्यंत नविन बाधंकामास परवानगी देता येत नसल्याने स्पष्ट नकार कळवला.
ही गोष्ट  युवराज संभाजीराजेंना समजल्यावर त्यांनी दि.२४/३/२०१७  रोजी  थेट पंतप्रधान नरेद्र मोदी यांची भेट घेतली. या पुलाची अवश्यकता  समजावुन सांगीतल्यावर पंतप्रधांनांनी पंतप्रधान कार्यालयाचे मुख्य सचिव राजीव टोपोनो(IAS) यांना बोलावून  त्यांच्या कडुन संपुर्ण माहीती घेतली.
पंतप्रधांनाच्या विशेष आधिकारात त्यांनी कायद्यात बदल करुन आज शिवाजीपुलाचा आणि देशभरातील इतर वास्तूंचा मार्ग मोकळा केला....
पंतप्रधानांनी युवराज संभाजीराजेंना भेटीदरम्यान दिलेल्या आश्वासनाची पुर्तता आज झाली.... आणि त्यासाठीच राजेंनी देशवासीयांच्या वतीने पंतप्रधान साहेबांचे मनापासून आभार मानले

Thursday 11 May 2017

National Technology Day : ११ मे हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

११ मे, १९९८ रोजी भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दाखवली. या प्रगतीचे प्रतीक म्हणून ११ मे हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
----------------------------------------------------


तंत्रज्ञान हे मानवी संस्कृती घडवणा-या घटकांत शासनव्यवस्था, समाजरचना, कर्म, तत्त्वज्ञान यांच्याइतकेच महत्त्वाचे आहे, असे मानले जाते. भारताचे तंत्रसामर्थ्य आजपर्यंत वेळोवेळी दिसून आलेले आहे.
सर्वसाधारणपणे मनुष्याने लावलेल्या आयुधे, साधने, तंत्रे, क्रिया अशा विविध प्रकारच्या, मनुष्याला जगून राहण्यासाठी आणि विकासासाठी उपयोगी अशा शोधांचा (इन्व्हेन्शन्स) तंत्रज्ञानात समावेश होतो. तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशील प्रज्ञेचे द्योतक आहे. आपल्या या सर्जनशीलतेच्या जोरावर आपल्या ज्ञानेंद्रियाच्या आणि शारीरिक क्षमतेच्या हजारोपट पुढे जाऊन मानवाने भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीचे एकामागोमाग एक टप्पे गाठले आहेत आणि एका बाजूने सूक्ष्मतम अणूतील ऊर्जा आपल्या कामी आणली आहे आणि दुस-या बाजूला अनंत अवकाशात भरारी घेतली आहे.
सोप्या शब्दात विज्ञान ‘का?’ या प्रश्नाचे उत्तर शोधते, तर तंत्रज्ञान ‘कसे’ याचे. इतिहासामध्ये ‘कसे’ साध्य झाल्यानंतर ‘का’ हा प्रश्न उपस्थित केला गेला याचे अनेक दाखले आहेत. उदा. वाफेचे, डिझेलचे अशी इंजिने वापरात आल्यानंतर कालांतराने त्यांच्या कार्यामागची तत्त्वे सांगणारे उष्मागतिशास्त्र विकसित झाले. आता मात्र, विज्ञानाचा पद्धतशीर उपयोग करून नवनवीन उत्पादने, तंत्रे, प्रक्रिया विकसित करण्यासाठी प्रचंड प्रयोगशाळा उभारल्या गेल्या आहेत. आधुनिक औषधनिर्मितिशास्त्र हे याचे बोलके उदाहरण आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आधुनिक जगात एक मोठा, सुसंघटित मानवी व्यवहार झाला आहे. सुदैवाने भारताला विसाव्या शतकात असे नेतृत्व लाभले की, ज्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखले. देशाच्या प्रगतीसाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या, शिक्षणाच्या, संशोधनाच्या संस्था उभारल्या पाहिजेत, उद्योग उभारले पाहिजेत, हे लक्षात घेऊन त्यांनी पावले उचलली.
२००८ साली चंद्रावर पोहोचलेले ‘चांद्रयान’, आपण उभारलेल्या अणुभट्टय़ा, १९९८ सालची अणुचाचणी, आपल्या संशोधनसंस्था, माहिती-तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील आपली लक्षणीय प्रगती, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, अन्नधान्याच्या बाबतीत आपल्याला स्वावलंबी बनवणारी ‘हरितक्रांती’ इत्यादी सर्व अभिमानाच्या बाबी आहेत.
राष्ट्रीय तंत्रज्ञानाच्या दिवशी त्या आठवून आपल्या स्वसामर्थ्यांची जाणीव करून घ्यायला हवी. त्याचबरोबर एक लक्षात घ्यायला हवे, अनेक वेळा तंत्रज्ञान ज्यांच्याकडे ते विकत घेण्याची, वापरण्याची क्षमता आहे, त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी ते उपयोगी पडते, परिणामी समाजातील विषमता वाढते. या विषमतेची दरी कमी कशी करता येईल, तंत्रज्ञान सर्वोपयोगी कसे ठरेल या दृष्टीने विचार आणि कृती करण्यासाठी तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने आपण संकल्पबद्ध व्हावयास हवे.
** आधुनिक सणवार : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
११ मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि ३० ऑक्टोबरला राष्ट्रीय शास्त्रज्ञ दिवस, असे तीन, विज्ञानाशी संबंध असलेले दिवस भारतात पाळले जातात. ११ मे १९९८ रोजी पोखरण-०२ या यशस्वी अण्वस्त्र चाचण्या केल्या, २८ फेब्रवारी १९२८ रोजी चंद्रशेखर रामन यांनी नोबेल पारितोषिक विजेता शोध लावला, तर ३० ऑक्टोबर १९०९ हा, भारताचे आण्विक शिल्पकार डॉ. होमी भाभा यांचा जन्मदिवस आहे. ११ मे १९९८ हा पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा झाला.
११ मे १९९८ रोजी भारताने, अणुगर्भीय चाचण्या साखळ्यांतील, पोखरण-२ प्रकल्पातील शक्ती-१, शक्ती-२ आणि शक्ती-३ या अणुस्फोट चाचण्या यशस्वीरीत्या घेतल्या. दोनच दिवसांनंतर म्हणजे १३ मे रोजी शक्ती-४ आणि शक्ती-५ आणखी दोन अणुचाचण्या घेतल्या. शक्ती-१ ही प्रभंजन प्रकारची, ४ ते ६ किलोटन क्षमतेची, शक्ती-२ अणुसंमिलन प्रकारची, १२ ते २५ किलो टन क्षमतेची, शक्ती-३ ही १ किलो टनपेक्षा कमी क्षमतेची होती. १३ मेच्या अणुचाचण्या कमी क्षमतेच्या होत्या. शक्ती-१ आणि शक्ती-२ या चाचण्यांची क्षमता अपेक्षेपेक्षा बरीच कमी होती. त्यामुळे, भारताच्या या चाचण्या अयशस्वी झाल्या अशी ओरड काही विदेशी संस्थांनी केली, परंतु आमचे तंत्रज्ञान कमी पडले असा खुलासा भारत सरकारने केला.
१८ मे १९७४ रोजी भारताने पहिली अणुस्फोट चाचणी घेतली आणि ती यशस्वी झाली. सायरस अणुभट्टीसाठी, जड पाणी देताना अमेरिकेने अशी अट घातली होती की त्या भट्टीत निर्माण झालेले प्लुटोनियम-२३९, अण्वस्त्र निर्मितीसाठी वापरले जाणार नाही.  ते अण्वस्त्र चाचणीसाठी वापरले गेले म्हणून अमेरिका आणि काही देशांनीसुद्धा, भारताच्या सर्वच अणुप्रकल्पांना असहकार दर्शविला, परंतु आपले प्रकल्प, स्वबळावर यशस्वी होतच राहिलेत. ते भारतीय तंत्रज्ञान विकासाचे यशच म्हटले पाहिजे. या पहिल्या अणुस्फोट चाचणीला- ‘बुद्धाने स्मितहास्य केले’, ‘बुद्धा स्माईल्ड’ असे संबोधिले जाते. ‘बुद्धाने स्मितहास्य केले’ असे पहिल्या अणुचाचणीच्या वेळी म्हटले जाते, कारण कदाचित, ती चाचणी बुद्धपौर्णिमेलाच करावयाची होती, पण तिला अकरा दिवस उशीर झाला. त्याच सुमारास, भारतीय रेल्वेचा भारतव्यापी संप सुरू होता हे आपल्याला आठवत असेलच. ११ मे १९९८ रोजी मात्र बुद्धपौर्णिमेची तिथी बरोबर साधली आणि बुद्धाने पुन्हा एकदा स्मितहास्य केले. अणुतंत्रज्ञान विकासाबरोबरच, भारताने, अवकाशसंशोधन, क्षेपणास्त्रे, उपग्रह दळणवळण, आयटी क्षेत्र वगैरे बाबतींतही नेत्रदीपक प्रगती केली आहे.
११ मेला आणखीही एक, भारताच्या इतिहासात महत्त्वाची घटना घडली आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय जनगणना आयोगाच्या, लोकसंख्या घडय़ाळानुसार, ११ मे २००० रोजी, १ अब्ज हा आकडा आला तेव्हा, बरोबर १२ वाजून ३२ मिनिटांनी दिल्लीत कुमारी आस्था अशोककुमार अरोरा या ‘अब्जाव्या’ भारतीय नागरिकाचा जन्म झाला आणि ती कन्या होती हे विशेष, भारताची लोकसंख्या अधिकृतपणे एक अब्ज झाली.
वाढती कारखानदारी, त्यासाठी नैसर्गिक संपत्तीचा अनिर्बंध वापर, उपयोगात आणलेल्या, वापरून झालेल्या वस्तूंची आणि पदार्थाची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यामुळे पर्यावरणातील वाढते प्रदूषण, वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणा-या समस्या, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, दैनंदिन गरजा आणि चैनी भागविण्यासाठी लागणारा पैसा मिळविण्यासाठी दिवसेंदिवस वाढतच जाणारी जीवघेणी स्पर्धा इत्यादी विज्ञानीय प्रगतीच्या दुष्ट परिणामांवर उपाययोजना करण्यासाठी, त्याबाबत जनजागृती करण्यासाठी, समाजातील विचारवंतांनी निरनिराळे दिवस किंवा ‘दिन’ पाळण्याची प्रथा किंवा प्रघात रूढ केला.
त्या निमित्ताने एखादी विशिष्ट समस्या प्रकर्षाने चर्चिली जावी, त्या समस्येचे वास्तवरूप जनमानसाला समजावे, त्यावर योग्य ती उपाययोजना व्हावी, सर्वाकडून वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर प्रयत्न व्हावेत, असा या निरनिराळे ‘दिन’ पाळण्याचा किंवा साजरे करण्याचा मुख्यत्वेकरून उद्देश असतो.
थोडक्यात म्हणजे हे निरनिराळे ‘दिन’ पाळणे म्हणजे आधुनिक सणवार पाळण्यासारखेच आहे. ज्या दृष्टिकोनातून पूर्वी सणवार आणि व्रतकैवल्ये रूढ झालीत, त्याच जनहिताचा आणि समाजहिताचा विचार आजही कायम आहे, सक्रिय आहे असाच अर्थ हे ‘दिन’ साजरे करण्यामागे आहे, असे वाटते.
** तंत्रज्ञान दिवस
मे महिन्यामध्ये आपण ‘तंत्रज्ञान दिवस’ साजरा करतो. आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही, तेही स्वत: प्राप्त केल्यावरच विकास होऊ शकतो. ज्या-ज्या वेळेला आपण आपल्या विकासासाठी, अणुतंत्रज्ञान असो वा अवकाश तंत्रज्ञान, विकसित करण्याचे प्रयत्न केले , त्या-त्या वेळी इतर राष्ट्रांनी आपल्यावर बंधने घातली. पहिल्या अणुस्फोटानंतर अमेरिकेने, यशस्वी रॉकेट प्रयोगानंतर रशियाने मार्गात विघ्ने घातली. रशियन भूमीवरून आपला उपग्रह आकाशात झेपावण्याच्या तयारीत असताना, रशियाने उड्डाणाची रक्कम वाढवून मागितली. ‘साईट’ या शैक्षणिक उपग्रहीय संदेशवहनाच्या यशस्वी प्रयोगानंतर अमेरिकेने दुसरा उपग्रह नाकारला, तेव्हा आपल्याला ‘स्टेप’ या दुस-या प्रयोगासाठी जर्मनीच्या ‘सिंफनी’ या उपग्रहाची मदत घ्यावी लागली.
हे सर्व या इथे सांगायचे कारण, सवंग प्रतिक्रिया व्यक्त न करता, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रयोगांकडे आपण डोळस व विधायक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे.
( सौजन्य- मराठी विज्ञान परिषद )
Source : http://prahaar.in
#राष्ट्रीयतंत्रज्ञानदिवस #NationalTechnologyDay

आपली माणसं


Thursday 4 May 2017

स्त्रीयांनी वाचाव अस काही

स्त्रीयांनी वाचाव अस काही 


एकदा एक स्त्री भयचकित अवस्थेत एका उंच आणि धोकादायक पुलाच्या टोकाला उभी असते.



खूप घाबरलेली आणि अगदी एकटी…. 




तिचा नवरा, आयुष्याचा जोडीदार असतो पुलाच्या दुसऱ्या टोकाला …



तिला तो दिसत नसतो आणि त्याला ती …



त्याने याव म्हणून ती खूप साद घालते त्याला …


पण त्याच्याकडून प्रतिसाद शून्य ….


घाबरलेली बावरलेली ती पुन्हा पुन्हा हाक मारत राहते … आर्ततेने



त्याच उत्तर येत



"मी बिझी आहे तू कर ना प्रयत्न स्वत:च,
जिथे तिथे मीच का हवा तुला …
स्वत:च काम स्वत: करायला शिक ना  जरा"




ती दुखावते … मोडते
पण लगेच सावरते


आणि हिमतीने पाउल टाकते त्या धोकादायक उंचच्याउंच पुलावर




…. कशीबशी पार करते तो पूल
मनातली अपमानाची धग दडपून



मात्र त्याला बघताच





बांध फुटून रडत धाव घेते त्याच्याकडे




कारण …



























…. कारण पुलाची मोडलेली बाजू सावरलेली असते त्याने आपल्या खांद्यावर …. तिच्या सुरक्षिततेसाठी .


















कधी कधी स्त्रियांना वाटते कि आपला नवरा गप्प गप्प का?





काहीही मदत नाही करत…






भलेही तो काही करतांना  दिसत नसेल…
पण जेव्हा तुम्ही आत्मविश्वास गमावतात तेव्हा










तो कदाचित पुलाची दुसरी बाजू सावरत असेल …
असा असतो तो..













           "पुरुष कोण आहे ?"







पुरुष हा निसर्गाने बनवलेली अशी एक सुंदर गोष्ट आहे, जो आपल्या अगदी कमी वयापासून compromise करायला चालू करतो!










तो आपल्या हिश्श्यातील chocolate सुद्धा आपल्या बहिणीला देतो!









तो आपल्या आई-वडिलांच्या सुखासाठी आपल्या स्वप्नांचे बलिदान देतो!






तो आपले सर्व pocket money अशा मुलीसाठी खर्च करतो जिच्या चेहऱ्यावरील हसू पाहायला त्याला आवडते!











तो आपले पूर्ण तारुण्य आपल्या बायको आणि मुलांच्या सुखासाठी रात्री-बेरात्री काम करून कुठल्याही तक्रारीविना खर्च करतो!







तो त्यांच्या भविष्यासाठी बँकेतून लोन आणि कर्ज घेतो आणि जन्मभर ते फेडत बसतो!







तो खूप संघर्ष करतो आणि तरीही त्याच्या आईचे, बायकोचे आणि बॉस चे ओरडे खातो!






शेवटी त्याचे आयुष्य दुसऱ्यांसाठी झटण्यातच संपते!





आईचे ऐकले तर त्याला MAMA's  Boy बोलतात आणि


बायकोचे ऐकले तर त्याला बायकोचा बैल बोलतात!



प्रत्येक पुरुषाचा आयुष्यात respect करा!
कारण तुम्हाला माहित नसेल त्याने आयुष्यात तुमच्यासाठी कुठले बलिदान दिले असेल!


हा message प्रत्ये पुरुषाला पाठवा, त्याच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी आणि    
प्रत्येक स्त्रीला पाठवा तीलाही किमंत समजायला हवी.

Wednesday 3 May 2017

काही लोकांनी इमानेइतबारे पार पाडून इंडस्ट्रीसाठी नवा खेळ सुरु केलाय

बाहुबली-२चे धर्मवादीकरण काही लोकांनी इमानेइतबारे पार पाडून इंडस्ट्रीसाठी नवा खेळ सुरु केलाय. त्यांना आता मोठे कोलित हाती लागले आहे. ११ ऑगस्ट २०१७ ला दोन चित्रपट रिलीज होताहेत. यातला एक आहे अक्षयकुमारचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' आणि शाहरुखखान अभिनित दिग्दर्शक इम्तियाज अलीचा 'रौला'. अक्षयचा सिनेमा पीएम मोदीजींच्या महत्वाकांक्षी स्वच्छता अभियानाशी थीमसाधर्म्य असणारा व महाराष्ट्रात घडलेल्या एका सत्यकथेवर आधारित आहे, तर 'रौला' हा अनुष्का शर्मा - शाहरुखचा हलका फुलका रोमान्सपट आहे. या दोन सिनेमातील लढत कलेच्या दृष्टीकोनाऐवजी जातधर्माच्या आणि स्वयंघोषित राष्ट्रीयत्वाच्या सापेक्षतेनुसार सोयीस्कररित्या रंगवली जाईल अशी चिन्हे सोशल मिडीयावर आत्ताच दिसू लागली आहेत.


यापूर्वी अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार' आणि एसआरकेचाच 'जब तक है जान' यात अशीच टक्कर झाली होती. त्याची पुनरावृत्ती 'शिवाय' आणि 'दिलवाले'च्या निमित्ताने पुन्हा अनुभवास आली. तर एसआरकेच्याच 'रईस' आणि ऋतिकच्या 'काबिल'ला देखील असे रंग देण्याचे प्रयत्न झाले होते. सनी देओलच्या 'गदर एक प्रेमकथा' आणि आमीरखानच्या 'लगान'च्या वेळेस असाच तणाव जाणवला होता. विशेष म्हणजे यांच्यातच याआधी 'घायल'आणि 'दिल'च्या वेळेस अशीच टक्कर झाली होती.
योगायोगाने २०१३ च्याही ऑगस्टमध्येच खिलाडीकुमारच्या 'वन्स अपोन टाईम इन मुंबई दोबारा' आणि एसआरकेच्याच 'चेन्नई एक्सप्रेस'मधली टक्कर फक्त एक आठवड्याने टळली होती. खरे तर हे दोघेही अभिनेते भिन्न प्रकृतीचे आणि वेगळ्या धाटणीचे अभिजात कलावंत आहेत. ते आपल्या जागी श्रेष्ठ आहेत यात शंका नाही. त्यांच्यात अगदी निखळ दोस्ताना नसला तरी वैमनस्यही नाही हे सर्वश्रुत आहे मात्र काही फुटकळ चाहते व धर्मवादाचे झेंडे नाचवणारे संधीसाधू या दोघांना वेगळे 'रंग' लावून, आपल्या चष्म्यातून त्यांच्यातील संबंध जोखू लागले आहेत ही खेदाची बाब आहे....    
अक्षयने त्याचा 'एअरलिफ्ट' प्रजासत्ताक दिनाजवळ (२२ जानेवारी)  रिलीज केला होता तर 'रुस्तुम' स्वातंत्र्यदिनाआधी तीन दिवस रिलीज केला होता. आता पुन्हा एकदा स्वातंत्र्यदिनाच्या चार दिवस आधी तो त्याचा महत्वाकांक्षी चित्रपट घेऊन येतोय. मागील पाच वर्षात अक्षयला काही लोकांकडून 'अँटी'खान आणि पॅट्रीऑटीक आयकॉन म्हणून जाणून बुजून प्रोजेक्ट केले जातेय. तर शाहरुख त्याच्या वादग्रस्त वक्तव्याने काही लोकांच्या देशद्रोह्यांच्या यादीत नामांकित झाला आहे. या शिवाय या दोघात अलीकडील काळात सुरु असणारे टशन सर्वश्रुत आहे. यांच्यात शीतयुद्ध व्हावे असे इंटरटेनमेंट मिडीयाला वाटते कारण त्यातून त्यांचे टीआरपीचे गणित साधते. भारत पाकिस्तान युद्धाच्या वावड्या उठल्या की न्यूज मिडीयाचा टीआरपी चांगला वधारतो त्यामुळे तेही अशा तथाकथित वादांची वाट बघत असतात. त्यावर आपली पोळी भाजून घेतात. या सर्व शक्यता अशक्यतांच्या गणितावर कडी होईल ती, रिलीजच्या काळात असणारया(पंधरा ऑगस्ट) देशभक्तीच्या वारयाची. त्यामुळे  'टॉयलेट एक प्रेमकथा' आणि 'रौला'च्या निमित्ताने एक तुंबळ शीतयुद्ध बॉलीवूड आणि रसिकांना अनुभवाला येईल अशी चिन्हे आहेत. 
कोणतीही स्पर्धा ही निकोप असावी अन कलागुणांवर आधारित असावी याचा विसर हळूहळू सर्वच क्षेत्रात पडत चाललाय हे दुर्दैवी आहे. असो...या  सर्व प्रकारातून बॉलीवूडला धार्मिक रंग देण्यात येतोय जो कलेच्या निकोप  जोपासनेसाठी निश्चितच योग्य नाही...
या दोन्ही चित्रपटांना माझ्याकडून शुभेच्छा ...
- समीर गायकवाड.   
(सूचना  - पोस्टवर जातीय / धार्मिक वा वैयक्तिक द्वेषमूलक कॉमेंटस करू नयेत.)


Tuesday 2 May 2017

वडील विकायचे कॅसेट, वयाच्‍या 24 व्‍या वर्षी मुलाने विकत घेतली IPL टीम

सध्‍या देशात आयपीएलचा ज्‍वर वाढला आहे. यंदा आयपीएलमध्ये एकून 59 सामने होणार आहेत. यातील सोमवरपर्यंत 28 सामने पार पडले आहेत. म्हणजेच आयपीएलचे जवळपास निम्मे सामने संपले असून, स्पर्धा मध्यावर पोहचली आहे. या स्‍पर्धेत सहभागी गुजरात लायन्‍स या संघाचा मालक केशव बन्सल केवळ 25 वर्षांचा आहे. त्याने वयाच्या 24 व्या वर्षी आयपीएलमध्ये टीम विकत घेण्याचा पराक्रम केला आहे.त्‍याच्‍या विषयी ही खास माहिती...


संयुक्त कुटुंबात गेले बालपण-
- केशव याचे बालपण दिल्लीत एका संयुक्त कुटुंबात गेले. 15 सदस्यीय या कुटुंबात केशव तीन काकांसोबत राहायचा.
- वडील नरेंद्र राजस्थानातून दिल्ली विद्यापीठात येऊन शिकले आणि दिल्लीतच त्यांनी ऑडिओ कॅसेट विक्री सुरू केली.
वडिलांनी असा उभारला व्‍यवसाय-
- 80 च्या दशकात त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायासाठी एजंट म्हणून हाँगकाँगमध्ये जाऊन फ्लॉपीचे काम सुरू केले.
- 1993 मध्ये 20 हजार रुपयांत कॉम्प्युटर असेंब्लिंगचे काम इंटेक्स टेक्नॉलॉजीअंतर्गत करू लागले.
- नंतर 10 वर्षांतच कंपनी स्वत:ची उत्पादने बनवू लागली. केशव मोठा होईपर्यंत इंटेक्सने बरीच लोकप्रियता मिळवली होती.
- एमबीए शिक्षित केशव नंतर वडिलांच्या व्यवसायात मदत करू लागला. 19 व्या वर्षी कंपनीचे लॉजिस्टिक विभाग सांभाळण्यापासून त्याने सुरुवात केली आणि नंतर मार्केटिंगमध्ये उतरला.
- मागील 3 वर्षांत त्याने कंपनीच्या 20 जाहिराती बनवल्या आहेत.
संघाचे नाव गुजरात लायन्स का ठेवले ?
- केशवने मागच्या वर्षी संघाच्या लिलावापूर्वी संघ प्रायोजकत्वासाठी बीसीसीआयशी चर्चा केली होती.
- यातूनच गुजरात लायन्सचा संघ तयार झाला. केशवच्या आई अल्पा मूळच्या राजकोटच्या असणे हेसुद्धा गुजरात लायन्सच्या निवडीमागचे एक कारण आहे.
- आयपीएलमध्ये आतापर्यंत एकही मोबाइल ब्रँड नव्हते, परंतु केशवने इंटेक्सच्या रूपात तो दिला. रिलायन्सनेही 4 जीसाठी इंटेक्स हँडसेटची निवड केली आहे.
- केशवला अभिनयाचाही छंद आहे. मात्र, आतापर्यंत त्याने चित्रपटांत भूमिका साकारली नाही. इंटेक्स कंपनीच्या जाहिरातीत तो असतो.
संक्षिप्‍त परिचय-
- वय : 25 वर्षे
- वडील : नरेंद्र बन्सल, आई : अल्पा, बहीण-ईशिता
- शिक्षण :वसंतकुंजच्या द हेरिटेज स्कूलमधून शिक्षण, नवी दिल्लीच्या आयआयएलएममधून व्यवस्थापनाचे शिक्षण, मँचेस्टर स्कूल ऑफ बिझनेसमधून वर्षभराचा अभ्यासक्रम.
















Popular Posts