Thursday 17 August 2017

अशी बनणार लाकडी कार!

लाकडी कारसोबत आपण लहानपणी खेळलो. पण आता याच खेळण्यातल्या लाकडी कार खऱ्या अर्थानं चालवता आल्या तर..? मंडळी, आता येत्या 10 वर्षात तुम्ही स्टील, अॅल्युमिनिअमच्या पार्टपेक्षा लाकडापासून बनवलेली कार चालवू शकता. कारण जपानी संशोधक आणि कारचे इन्टर पार्टस बनवणाऱ्यांनी हे संशोधन केलं आहे.
लाकडी कार ही वजनानं हलकी असेल, मजबुतीला पाचपट असेल, शिवाय यात लाकडांचे तंतू वापरले जाणार आहेत. लाकडांच्या तंतूंचा वापर करून त्याचा प्लॅस्टिकसोबत संयोग घडवून एक मिश्रण तयार केलं जाईल, ज्याद्वारे गाडीचे अनेक पार्ट्स बनवले जातील.
हे मिश्रण स्टील आणि अॅल्युमिनिअमला उत्तम पर्याय असेल. शिवाय, याचा खर्च हा साध्या कारच्या उत्पादन खर्चाच्या पाचपट कमी असेल. पण आता या लाकडी कारनं पेट घेतला तर काय? शिवाय, लाकडांच्या तंतूंवर पाण्याचा काय परिणाम काय होईल, हे मात्र अजूनही कळलेलं नाही.
येत्या 10 वर्षांत स्टीलच्या कारपार्टसला पर्याय म्हणून लाकूड असू शकतं परंतु याला कार्बनबेस्ड मटेरियल आणि आर्थिकदृष्टया परवडणं यामुळे मोठी स्पर्धा निर्माण होईल, असंही संशोधकांचं म्हणणं आहे.
माणसानं पृथ्वीच्या पोटातून गेली कित्येक वर्षे लोह खनिज काढून घेतलं आहे. पण कधी ना कधी हा साठा संपुष्टात येणार आहे. जी गोष्ट इंधनाची, तीच खनिजाची, तेव्हा अशा पर्यायांचा विचार आतापासून केला. तर भविष्यात जगणं सुकर होईल.
फक्त या कारने झाडांच्या कत्तली होणार नाहीत आणि झाल्या तर तितकीच झाडे वाढवण्याची जबाबदारी कंपन्यांवर ठेवावी म्हणजे झालं.




Source abp Maza

Achiseekh.com

No comments:

Post a Comment

Popular Posts