Thursday, 17 August 2017

‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका

आपल्या दिलखेचक अदांनी साऱ्यांनाच घायाळ करणाऱ्या सनी लियोनीचा ‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’ हे गाणं रिलीज झालं आहे.

  
बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लियोनी आता मराठी सिनेमात दिसणार आहे. आगामी ‘बॉईज’ सिनेमाच्या एका गाण्यात सनी लियोनी थिरकणार आहे. या गाण्याचा व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे.
आपल्या दिलखेचक अदांनी साऱ्यांनाच घायाळ करणाऱ्या सनी लियोनीचा ‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’ हे गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं ‘बॉईज’ सिनेमातील आहे.
‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’ आणि ‘मेरा बाबू’ ही दोन गाणी एकत्र करुन नवं गाणं तयार करण्यात आलं आहे. संगीतही ठेका धरायला लावणारं असल्याने प्रेक्षकांच्याही पसंतीस पडेल, यात शंका नाही. त्यात सनी लियोनीने अफलातून डान्सही केला आहे.


सैराटमधल्या ‘झिंगाट’मधून बाहेर पडत आता प्रेक्षक सनी लियोनीच्या ‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर थिरकताना दिसली, तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

Source : Achiseekh.com

 

No comments:

Post a Comment

Popular Posts