Monday 21 August 2017

अंबानीच्या Antilla पेक्षाही मोठे घर असलेला करोडपती आज फिरतो रस्त्याने पैदल..

भारतातील सर्वात मोठी कंपनी रेमंडचे एकेकाळचे मालक, त्यांचे घर JK हाउस हे अंबानीच्या घरापेक्षाही उंच आहे पण आज तोच माणूस चाळीत राहतो रस्त्याने पैदल फिरतो , स्वतःच्या इलाज करिता हि त्याच्या जवळ पैसा नाही वाचून धक्का बसेल ना ?
हो हे खरे आहे आज कोणीही त्यांना विचारल असे का झाले तर ते म्हणतील “आपल्या मुला बाळावर प्रेम करा परंतु आंधळे प्रेम करू नका…”
या सर्वाचे कारण मुलगा गौतम सिंघानिया, १२,००० करोडची कंपनी असलेल्या रेमंड ग्रुपचा मालक सध्या गौतम सिंघानिया आहे. कामकाजातून निवृत्ती करिता विजयपत सिंघानिया यांनी आपल्या वाटणीचे कंपनीतील ३७.७ % शेअर्स गौतमच्या नावाने केले स्वतः जवळ रुपयाही ठेवला नाही आणि होत्याचे नव्हते झाले विजयपत यांना मुलाने उपकाराची जाणीव न ठेवता घरातून ७९व्या वर्षी बेदखल केले.
विजयपत सिंघानियान उंचीचे आणि विमानाचे वेड होते. त्यांच्या स्वतःच्या विमानाला ते कधी पायलट राहत नव्हता स्वतः एक वैमानिक होते विजयपत सिंघानिया.
१२ सप्टेंबर १९९८ ची गोष्ट कानपूर येथील विमानतळावर एक छोटे विमान उतरले आणि वैमानिक होते विजयपत सिंघानिया,
लंडन ते कानपूर हजारो किलोमीटरचा टप्पा त्यांनी एकट्यानी गाठला हा एक आगळावेगळा विक्रम होता. विमानतळा बाहेर हजारो लोकांची गर्दी झाली विजयपत यांचा सत्कार करायला.
अंबानी पेक्षाही मोठे घर असलेले विजयपत सिंघानिया यांना घरातून गौतमनि बेदखल केले. स्वतःच्या घरात राहण्या करिता विजयपत यांनी आता कोर्टात दावा टाकला आहे. त्यांची गाडी व ड्रायवर सुध्दा मुलांनी काढून टाकला. आज विजयपत दक्षिण मुंबईत एका चाळीत राहतात व पैदल फिरण्याशिवाय त्यांच्या कडे कुठलाही इलाज नाही.
आजपर्यंत विजयपत सिंघानिया यांनी १०० पेक्षा अधिक पल्ले व ७००० किमी पेक्षा जास्त विमान उडान केली आहे त्यांच्या करिता हवाई क्षेत्रातील सर्वाच्च पुरस्कार Fedreation Aeuronatic International तर्फे सुवर्ण पदक देण्यात आले.
१९९४ साली त्यांनी ROUND THE WORLD AIR RACE करिता स्वतःचे नावाचे नामांकन दिले होते. तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांनी त्याचा “एयर कमांडर” या पदवीने सन्मान केला होता. या व्यतिरिक्त भारतीय वायुसेनेच्या Squarden No. 7 चे एकमेव असैनिक सदस्य आहेत. २००६ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सिनेमातील नटसम्राट आपण पहिला पण हा आहे मुलांनी केलेल्या विश्वासघातामुळे झालेला खर्या आयुष्यातील नटसम्राट विजयपत सिंघानिया…
लेख आवडल्यास नक्की शेअर करा
आपली माणसं 





No comments:

Post a Comment

Popular Posts