सध्या सर्वानाच सारे
काही घरपोच हवे असते, ते देखील कोणत्याही प्रकारे त्रास न होता. शेवटी आपण
ज्या जगात राहतो ते सध्या गतिमान झाले आहे हेच खरे. त्याचवेळी येथे ई-
कॉमर्सने ग्राहकांची ही गरज ओळखून त्यांना सहजपणे सा-या गोष्टी कशा मिळवता
येतील याचा विचार केला आहे. यात अनेक स्टार्टअपने देखील सुरूवात केली आहे
की, खाद्यपदार्थापासून सारे काही घरपोच देता यावे. यातील बहुतांश सध्या
नागरी किंवा शहरी भागात कार्यरत आहेत, त्यामुळे अनेक छोटी मध्यम शहरे यातून
वगळली गेली आहेत. हीच गोष्ट लक्षात घेवून रघुविरसिंह चौधरी, यांनी
स्टार्टअप सुरू केले, जे नाश्ता आणि चहा जयपूरमध्ये घरपोच देते.
जयपूरचेच रहिवासी असलेल्या रघुवीर यांची
पार्श्वभुमी गरीब घरातील आहे. घरच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांना शालेय
शिक्षणानंतर उच्च शिक्षण घेता आले नाही. पैसा मिळवण्यासाठी ते ऍमेझॉन सोबत
डिलीवरी बॉय म्हणून काम करु लागले. जेथे त्यांना प्रतिमहिना नऊ हजार रूपये
मिळत होते. त्यावेळी त्यांच्याकडे दुचाकी वाहन नव्हते, ते सायकलने प्रवास
करत आणि प्रत्येक ग्राहकाला वस्तू पोहोचवित असत.
सायकलने फिरताना रघुवीर थकून जात आणि ते नेहमी चहा नाश्ता करण्यासाठी थांबत असत. चहाचे चांगले ठिकाण शोधताना त्यांना नेहमी आव्हान असायचे. त्यांना जाणवले की येथे त्यांच्यासारखेच अनेक जण होते ज्यांना दिवसभर थकल्यावर चहा नाश्ता हवा असे मात्र सहजपणे तो मिळत नसे. त्यामुळे त्यांच्या मनात असा स्टार्टअप सुरू करण्याच्या कल्पनेने जन्म घेतला.
तीन मित्रांना सोबत घेवून रघुवीर यांनी त्यांच्या कल्पनेवर काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी त्यांचे नेटवर्क (जनसंपर्क)तयार केले होतेच जे जवळचे वेंडर्स होते, त्यात शंभर नव्या वेंडर्सची भर पडली. त्यांची पुरविलेला चहा आणि नाश्ता इतका छान होता की, आता अनेक नवे वेंडर्स आहेत ते केवळ त्यांच्याकडूनच चहा नाश्ता मागवितात. यासाठी त्यांनी स्वत:चे दुचाकी वाहन विकत घेतले ती या प्रवासातील सर्वात मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.
सध्या रघुवीर यांची जयपूरात चार चहा वितरण केंद्र आहेत, आणि रोज पाचशे ते सातशे जणांच्या सरासरी मागण्या ते पूर्ण करतात. ते दरमहा लाखभर रूपये यातून कमावितात. आणि अभिमानाने सांगतात की, डिलवरीसाठीच्या ‘चार बाईक्सचे ते मालक झाले आहेत’.

No comments:
Post a Comment