सध्या देशात आयपीएलचा ज्वर वाढला आहे. यंदा आयपीएलमध्ये एकून 59
सामने होणार आहेत. यातील सोमवरपर्यंत 28 सामने पार पडले आहेत. म्हणजेच
आयपीएलचे जवळपास निम्मे सामने संपले असून, स्पर्धा मध्यावर पोहचली आहे. या
स्पर्धेत सहभागी गुजरात लायन्स या संघाचा मालक केशव बन्सल केवळ 25
वर्षांचा आहे. त्याने वयाच्या 24 व्या वर्षी आयपीएलमध्ये टीम विकत घेण्याचा
पराक्रम केला आहे.त्याच्या विषयी ही खास माहिती...
संयुक्त कुटुंबात गेले बालपण-
- केशव याचे बालपण दिल्लीत एका संयुक्त कुटुंबात गेले. 15 सदस्यीय या कुटुंबात केशव तीन काकांसोबत राहायचा.
- वडील नरेंद्र राजस्थानातून दिल्ली विद्यापीठात येऊन शिकले आणि दिल्लीतच त्यांनी ऑडिओ कॅसेट विक्री सुरू केली.

वडिलांनी असा उभारला व्यवसाय-
- 80 च्या दशकात त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायासाठी एजंट म्हणून हाँगकाँगमध्ये जाऊन फ्लॉपीचे काम सुरू केले.
- 1993 मध्ये 20 हजार रुपयांत कॉम्प्युटर असेंब्लिंगचे काम इंटेक्स टेक्नॉलॉजीअंतर्गत करू लागले.
- नंतर 10 वर्षांतच कंपनी स्वत:ची उत्पादने बनवू लागली. केशव मोठा होईपर्यंत इंटेक्सने बरीच लोकप्रियता मिळवली होती.
- एमबीए शिक्षित केशव नंतर वडिलांच्या व्यवसायात मदत करू लागला. 19 व्या वर्षी कंपनीचे लॉजिस्टिक विभाग सांभाळण्यापासून त्याने सुरुवात केली आणि नंतर मार्केटिंगमध्ये उतरला.
- मागील 3 वर्षांत त्याने कंपनीच्या 20 जाहिराती बनवल्या आहेत.

संघाचे नाव गुजरात लायन्स का ठेवले ?
- केशवने मागच्या वर्षी संघाच्या लिलावापूर्वी संघ प्रायोजकत्वासाठी बीसीसीआयशी चर्चा केली होती.
- यातूनच गुजरात लायन्सचा संघ तयार झाला. केशवच्या आई अल्पा मूळच्या राजकोटच्या असणे हेसुद्धा गुजरात लायन्सच्या निवडीमागचे एक कारण आहे.
- आयपीएलमध्ये आतापर्यंत एकही मोबाइल ब्रँड नव्हते, परंतु केशवने इंटेक्सच्या रूपात तो दिला. रिलायन्सनेही 4 जीसाठी इंटेक्स हँडसेटची निवड केली आहे.
- केशवला अभिनयाचाही छंद आहे. मात्र, आतापर्यंत त्याने चित्रपटांत भूमिका साकारली नाही. इंटेक्स कंपनीच्या जाहिरातीत तो असतो.

संक्षिप्त परिचय-
- वय : 25 वर्षे
- वडील : नरेंद्र बन्सल, आई : अल्पा, बहीण-ईशिता
- शिक्षण :वसंतकुंजच्या द हेरिटेज स्कूलमधून शिक्षण, नवी दिल्लीच्या आयआयएलएममधून व्यवस्थापनाचे शिक्षण, मँचेस्टर स्कूल ऑफ बिझनेसमधून वर्षभराचा अभ्यासक्रम.

No comments:
Post a Comment