सैराट.. या तीन अक्षरांच्या शब्दाने
अक्षरशः गेल्या वर्षभरात मराठी चित्रपटसृष्टीकडे पाहण्याचा सर्वांचा
दृष्टीकोनच बदलून टाकला आहे. 29 एप्रिल 2016 रोजी सैराट चित्रपट प्रदर्शित
झाला. त्यानंतर जे घडले तो इतिहास होता. नागराज मंजुळे हे नावही तसेच
काहीसे जादुई. सैराटचे सर्व श्रेय नागराज मंजुळेचे असे म्हटले तरीही वावगे
ठरणार नाही. त्यामुळेच सैराटप्रमाणेच नागराजही सर्वांसाठी आकर्षणाचा विषय
राहिला आहे. सैराटच्या प्रदर्शनाला शनिवारी एक वर्ष पूर्ण होत आहे.
त्यानिमित्ताने आपण सैराटचा सर्वेसर्वा असलेल्या नागराज मंजुळेच्या
आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत.
नागराज मंजुळे यांचे आयुष्य प्रचंड विलक्षण असे राहिलेले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नागराज मंजुळे यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्याविषयी वर्णन केले आहे. विशेषतः त्यांचे बालपण हे प्रचंड चढउतारांचे राहिलेले आहे. प्रचंड व्यसनाधीनता आणि सातवीत असताना अचानक या सर्वातून बाहेर पडणे हे वाचायला वाटते तेवढे प्रत्यक्षात सोपे नाही. या मुलाखतीच त्यांच्या जीवनातील अनेक पैलू समोर आले आहेत, तेच या माध्यमातून वाचकांसाठी देत आहोत. या पैलूंच्या आधारे नागराज मंजुळे आणि त्यांच्या चित्रपटांबाबत जास्तीत जास्त समजून घेता येईल.
Source: दिव्य मराठी
No comments:
Post a Comment