Friday, 30 June 2017

एका माणसाचं निधन होतं..



एका माणसाचं निधन होतं..

हे त्याच्या लक्षात येतं जेव्हा साक्षात भगवंत हातात एक गाठोड़ घेऊन त्याच्या समोर प्रगटतात.
भगवंत आणि त्या माणसामधील संवाद...
भगवंत -
वत्सा, चल आधीच उशिर झालाय !
माणूस -
पण देवा मला तर तुम्ही फार लवकर आणलंत. मला आणखी खुप काही करण्याची इच्छा आहे.
भगवंत -
माफ कर, अगोदर च फार उशीर झाला आहे.
माणूस -
पण भगवंता, ह्या गाठोडयात काय आहे ?
भगवंत -
जे आहे ते तुझंच आहे !
माणूस -
माझं म्हणजे माझ्या वस्तू, कपडे पैसे.....???
भगवंत -
ते काही नाही कारण त्या सर्व भुतलाशी संबंधित आहेत.
माणूस -
माझ्या आठवणी ?
भगवंत -
त्या काळाशी संबंधित आहेत.
माणूस -
माझं कर्तृत्व...?
भगवंत -
नाही ते परिस्थितीशी संबंधित आहे.
माणूस -
माझे मित्र आणि परिवार..?
भगवंत -
नाही वत्सा ते तर तुझ्या प्रवासातील सोबती होते..
माणूस -
माझी पत्नी व मुलं..?
भगवंत -
ते तर तुझ्या हृदयात आहेत.
माणूस -
मग माझं शरीर आहे का त्या गाठोडया मधे???
भगवंत -
नाही, नाही ते तर राख झालं..
माणूस -
मग नक्की माझा आत्मा असेल.....
भगवंत -
वत्सा तु परत चुकलास तुझा आत्मा तर माझ्याशी संबंधित आहे...
माणसाच्या डोळ्यातून आता तर अश्रु ओघळतात.
त्याने भगवंताच्या हातातून ते गाठोडं घेतलं आणि मोठ्या आशेने उघडून बघितलं तर काय .......
रिकाम होतं ते...
निराश होऊन डोळ्यातील अश्रु पुसत
माणूस -
म्हणजे माझं स्वता:चं काहीच नाही ?
भगवंत -
अगदी बरोबर, तुझ्या मालकीच कधीच काही नव्हतं.
माणूस -
मग त्या सगळ्याचा अर्थ काय ??
जीवन हे क्षणभंगुर आहे..
फक्त. जगा..
प्रेम करा..
माणसं जोड़ा...

10 एकर जमीन विकली, पठ्ठ्याने गावासाठी धरण बांधलं

10 एकर जमीन विकली, पठ्ठ्याने गावासाठी धरण बांधलं


अकोला जिल्ह्यातील संजय तिडके या शेतकऱ्याने जिद्दीच्या जोरावर चक्क छोटं धरण बांधलं आहे. यामुळे इथली शेकडो एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. विशेष म्हणजे सरकारी यंत्रणेने वारंवार खोडा घालून हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण तिडकेंनी आपले भागिरथ प्रयत्न थांबले नाहीत.

इथलं शिवार जलयुक्त करण्याची जिद्द, दुष्काळाला हरवण्याची जिद्द, सगळीकडे हिरवळ निर्माण करण्याची जिद्द आणि संजय तिडके यांच्या याच जिद्दीतून हा बंधारा उभा राहिला आहे.

सांगवी दुर्गवाडाच्या संजय यांची 80 एकर जमीन. दरवर्षीच्या पावसात पीक आणि माती वाहून जायची. तर उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा. यावर कायमचा पर्याय म्हणून शिरपूर पॅटर्नचा बंधारा बांधण्याचा निर्णय झाला. आसपासच्या शेतकऱ्यांनीही साथ दिली. काम सुरुही झालं. मात्र अवैध वाळू उपसा करण्याचं कारण देत प्रशासनाने कामात खोडा घातला.

दरवर्षीचा प्रश्न सोडवण्यासाठी बंधाऱ्याचं काम सुरु केलं. मात्र अवैध वाळू उपसा करता असं सांगत प्रशासनाने काम थांबण्याचा इशारा दिला. माझ्याकडे रॉयल्टी आहे तरी हा खोडा, असं संजय तिडके म्हणाले.
प्रशासनाच्या भितीपोटी शेतकऱ्यांनी साथ सोडली, काम थांबलं. मात्र अशातही ध्येयवेड्या संजय यांनी माघार घेतली नाही. त्यांनी स्वत:ची दहा एकर जमीन विकली. पैसा उभा केला आणि थांबलेलं काम पुन्हा सुरु झालं.
सध्या 18 फूट उंच आणि 260 फूट लांब भिंतीचं काम पूर्ण झालं आहे. खोलीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे. या कामासाठी आतापर्यंत 20 लाख खर्च झाले आहेत.

सगळ्यांनी साथ सोडली तरी यावर संपूर्ण गावाचा हक्क आहे. सर्वांनी फुकट पाणी घ्या. पण आता मला माहित आहे की या कामावर सरकार आयत्या पिठावर रेषोट्या ओढायला येईल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया संजय तिडके यांनी दिली.

शेयर करा

Thursday, 15 June 2017

रक्तात कधीच धर्म-जात नसते

मी : डॉक्टर मला हिंदू रक्ताच्या दोन पिशव्या पाहिजेत.
.
.
डॉक्टर : हिंदू रक्त ? ते काय असतं ? तुम्ही रक्तगट सांगा ते रक्त मि
ळेल.
.
.
मी : बी पॉजिटीव (B+) हिंन्दू.
डॉक्टरः आमच्याकडे फक्त B+ रक्तगटाचं रक्त मिळतं.
.
.
मी : अहो... डॉक्टर साहेब माझा मित्र हिंन्दू आहे तर मग B+ हिंन्दू रक्त द्यायला नको का?
.
.
डॉक्टर : तुम्ही वेडे आहात का? रक्तात कसलं आलयं हिंन्दू-मुस्लिम-बुध्द-सिख-जैन... रक्त घ्यायचं असेल तर घ्या नाही तर इथून चालते व्हा.
.
.
मी : केस पेपर डॉक्टरच्या तोंडा समोर धरले आणि म्हणालो हे कशाला लिहलंय, पेशन्ट इनफोरमेशनमध्ये धर्म, जात ?
.
.
डॉक्टर : (घामाघूम होऊन) अहो... सिस्टम आहे तसं लिहावं लागतं..
.
.
मी : मग असली सिस्टम बदला ना..कशाला शिकून डॉक्टर झालात फक्त पैसा कमवायला.. बाळ जन्माला आलं कि, तुम्ही उच्च शिक्षित लोक इकडे जात-धर्म टाकता आणि बाळाला घरी घेऊन गेलं कि गोत्र, नक्षत्र, नाडी टाकतात. मग तो माणुस जन्मा पासून ते मृत्यु पर्यंत्त वाहतो नको त्या फालतू गोष्टीच ओझं....
.
.
डॉक्टरांनी पैसे घेतले. B+रक्त गटाच्या रक्ताच्या पिशव्या माझ्या हातात दिल्या आणि शांतपणे खाली मान घालुन माझ्या समोरून निघून गेले.
.
.
मित्रांनो, माणसाला माणुस म्हणुन जगु द्या आणि जगा...
उगाच नको त्या गोष्टीचा अहंकार बाळगू नका.
.
.
*रक्तात कधीच धर्म-जात नसते*
.
.
समजुन घ्या आणि समजुन द्या
मानवता हाच खरा धर्म आहे।

Monday, 12 June 2017

तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी

तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.
त्या अगोदर आमच्या आईबापांनी चिमणी कंदिलात दिवस काढले.
चार आण्याच्या पोस्ट कार्डवर उभ्या जिंदगीची ख्यालीखुशाली पाठवून उत्तरादाखल कित्येक अस्वस्थ रात्री काढल्या.


चालून चपला झीझवणारी हि शेवटची पिढी.
लग्नातलं लुगडं लेकीच्या पोरीच्या बाळतपणासाठी वापरणारी हि पिढी.
लसून कांद्याच्या जुड्या आड्याला लटकावून वर्षभर पुरवून खाणारी हि पिढी.
रानात दाना दाना वेचूनहि चार कणसाची बोंडे खुशाल दाराबाहेर चिमणी पाखरासाठी राखून ठेवणारी हि माझ्या आई बापाची पिढी.
ठिगळ लावून जगणारीही हि शेवटची पिढी.
कपडे फक्त अंग झाकण्यासाठी असतात  हे तत्वज्ञान जगणारी हि शेवटची पिढी.
कदाचित म्हणूनच माझ्या पिढीला जसा तंत्रज्ञानाचा विटाळ नव्हता तसाच माजहि नव्हता.
माझ्या पिढीने बंद पडलेले टीवी कधीच भंगारात विकले नाहीत.
बापाचं घड्याळ घालून आम्ही बोर्डाच्या परीक्षा दिल्या.
संपलेले सेल फोडून आम्ही खेळगाड्या बनवल्या.
ग्याटर आलेले टायर गल्लीबोळातून पळवत तरुण झालो.
तुटलेल्या क्यासेट शिवारात गुंडाळून आणि सायकलच्या रिमची कोळपी बनवून  आमच्यातले काही इंजिनियर झाले.
आमच्या पिढीत मोठ्या भावाकडून वारसा हक्काने वापरून जुन्या झालेल्या वस्तू लहान भावांकडे आल्या.
तंत्रज्ञानाने आम्हाला पांगळे केले नाही.
नाती नात्याला आणि माणस माणसांना या नं त्या कारणाने जोडलेली होती.
पण आता मात्र....
गाव पार पार हरवलं.
घरोघरी तंत्रज्ञान घुसलं.
रिचार्ज वाढले talktime संपला.
पिक्सल वाढले जगण्याचा एक्सल कमी झाला.
बघता बघता पिढी फोरजी झाली.
प्रत्येकाचं आयुष्य हि ज्याची त्याची मर्जी झाली.
जगणे मल्टीप्लेक्स झाले.
चौका चौकात पुढार्यांच्या पराक्रमाचे फ्लेक्स आले.
आता तर तो हरवलाय म्हणून पेपरात जाहिरातही देता येत नाही.
कारण हल्ली कळून चुकलंय, गेलेली गोष्ट परत येत नाही,मग ते बालपण असो किंवा गावपण.
या गावाला चूड लावली म्हणून आपण कुणाच्या नावाने खडे फोडायचे ?
या तंत्रज्ञानाच्या ? कारण तो बदलताना आपल्याला गुदगुल्या झाल्या.
तो हरवतानाही आपण होतोच आसपास.
दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही.
गावपण हरवायला नको होतं.
(कुठेतरी छानसं वाचलेलं....)




10 रु. नोकरी ते 10 हजार कोटीं ची उलाढाल

उद्योगपती असेच होता येत नाही


माणुस पण असाच मोठा होत नसतो.
10 रु. नोकरी ते 10 हजार कोटीं ची उलाढाल.
फिनोलेक्स चे संस्थापक प्रल्हाद परशराम छाब्रिया ऊर्फ pp यांचा थक्क करुण देणारा हा प्रवास. 35 वर्षा पूर्वी कोणाला स्वप्नात पण वाटल नसेल की हा मुलगा 1 दिवस उद्योग क्षेत्रा मधे आपले वर्चस्व निर्माण करुण फाइबर इंडस्ट्री वर राज्य करेल पण हे  शक्य झाल मेहनत चिकाटी आणी प्रयत्नवादा मुळे
      pp हे मुळ चे पाकिस्तान च्या सिंध प्रांतात ले त्यांचे वडिल परशराम छाब्रिया हे तिथील प्रसिद्ध कापड व्यापारी पण 1942 साली  वडिलांच आकस्मित निधन झाल आई 5 बहिणी व 5 भाऊ अस हे कुटुंब उघड्या वर आल. त्या वेळी प्रल्हाद छाब्रिया एका दूरच्या नातेवाईकाचा धागा पकडून पुण्यात आले. त्यावेळी त्यांच वय होत अवघ 12 वर्ष व शिक्षण 2री झालेल शिक्षाण नसल्य मुळे कोणी नोकरी देत नव्हत. शेवटी एका ठिकाणी त्याना सफाई कामगार म्हणून नोकरी मिळाली  16 ते 18 तास काम करू लागले दर महिना ते आपल्या आईला 30 रु पाठवत होते त्यातच1945 साली फाळणी च्या झळा बसु लागल्या तय मुळे सर्व छाब्रिया कुटुंब पुण्या मधे आले . नारायण पेठेत 2रूम मिळाल्या . त्यानंतर छाब्रिया बंधुनी मुंबई हुन कापड आणुन कापड विक्रिचा व्यवसाय चालु केला त्या मधे पण कसे तरी 5रू मिळायचे . त्या नंतर इलेक्ट्रोनिक्स च्या वस्तु विकु लागले   सरकारी निविदा भरणे चालूच होत. परिस्थिति पण खुप बिकटच होती कधी जेवन मिळत होत तर कधी पाणी पिउन भुक मिटवावी लागत होती.
      प्रयत्न मात्र चालुच होते . त्यातच देहु कँटोमेंट बोर्डा ची बेडिंग वायर ची निविदा निघाली आणी तोच छाब्रियां साठी टर्निंग पॉइंट ठरला  हे काम छाब्रियां ना मिळाल व 10 बाय 10 च्या खोलीतून फिनोलेक्स चा प्रवास सुरु झाला तो आज पर्यन्त कधी थांबला च नाही एका छोट्याश्या खोलीतुन सुरु झालेली ह्या कंपनीचे आज सगळ्या भारतभर जाळे पसरले आहे. पुणे, रत्नागिरी , शिरवळ, गोवा, उत्तराखंड अश्या 5 कंपनी व 11 कारखाने असा हा फिनोलेक्सचा पसारा वाढला आहे. २री नंतर शाळेत ही न जाऊ शकणारे छाब्रिया हे उद्योगपति झाले फ़क्त आणी फ़क्त कष्ट आणी प्रत्नांवरती.
    हार कधी या माणसाने मानलीच नाही असंख्य संकटे आली पण कधी मागे सरकला नाही तेही पाठिशी कोणीसुद्धा नसताना.आजच्या काळा मधे आमचा इंजीनियर इतक्या लवकर हारला की तो आज स्वताची इज्जत स्वताच सोशल मीडया वर काढत आहे . हे दुर्दैवच म्हणावं लागेल.
       उत्तुंग शिखरावर चढत असतानासुद्धा छाब्रिया कुटुंबाचे पाय हे सदैव जमीनीवरतिच राहिले. सगळा उद्योग व्यवस्थित चालु झाला होता कश्याचिच कमतरता नहव्ती तरीसुद्धा  छाब्रीयांच्या 5 ही जनांची मुल सकाळी लवकर कंपनी मधे येउन कचरा काढण्या पासुन ते केबल तयार करण्या पर्यन्तचे काम  न लाजता स्वता इतर कामगार लोकांबरोबर करायची.
      12 ला कंपनी च्याच कैंटीन मधे जेवण करुण ही पिंपरी मधुन लोकलने पुण्याला वाडिया कॉलेज ला शिक्षणासाठी जायची कॉलेज सुटलं  की परत कंपनी मधे कामाला यायची स्वतःचे वडिल उद्योगपती असताना  ही मुलं कधीच कामाला लाजली नाहीत म्हणून आज यशापर्यन्त पोहचलित.आणी आमच्या आजच्या मुलाना  वडिलांनी काम सांगण्या आधीच आई म्हणते तो - ती इंजीनियरिंगला आहे,याला आहे -- त्याला आहे, त्याला काम नका सांगू.
       जीवनात कोणतच काम हे कमी नसत आणी कामापेक्षा कोणी मोठं नसत हे प्रल्हाद छाब्रिया यांनी सिद्ध करुण दाखवल.
अश्या या तडफदार व खंबीर उद्योगपतिला प्रथम पुण्यस्मरणाच्या निम्मितान

शेतकर्यांशी जोडलेल ५० वर्षाच अतुट नात म्हणजेच ................
         *" फिनोलेक्स"*


Popular Posts