माझ्या घराजवळ बरेच दिवस मोठ्या इमारतीचे बांधकाम चालले होते.
तेथून जाताना मला रोज बांधकाम मजुरांची लहान मुले ऐकमेकांचा सदरा पकडून आगगाडीचा खेळ खेळताना दिसायची.
दररोज कुणीतरी इंजिन बनायचे आणि बाकिची मुले डबे व्हायची...
इंजिन आणि डबे रोज बदलली जायची,
पण...
फक्त अर्धी निकर घातलेला छोटा मुलगा हातातलं फडकं फिरवत गार्ड व्हायचा...
आज न राहवून
थांबून मी त्या गार्ड होणाऱ्या मुलाला बोलावून विचारले,
"बाळ तू रोज गार्ड होतोस, तुला कधी इंजिन, कधी डबा व्हायला आवडत नाही का?"
त्यावर तो मुलगा उत्तरला...
"बाबूजी मला घालावयास सदरा नाही त्यामुळे मागच्याला धरायला काही नाही. मग माझ्या मागे कोण येणार ?"
म्हणून मी रोज गार्ड बनूनच खेळात भाग घेतो...
"हे बोलताना त्याच्या डोळ्यांत मला पाणी तरळल्याचे जाणवले...
त्या मुलाने आज जीवनाचा एक धडा शिकविला !
*आपले जीवन हे कधीच परिपूर्ण नसते. त्यात काही ना काही कमतरता असणारच...*
*तरीही आपल्याला जीवनाचा खेळ खेळावा लागणारच.*
त्या मुलाला घालावयास सदरा नाही म्हणून आई- बापावर रागावून, रुसून रडत बसता आले असते...
पण,
*तसे न करता आहे त्यात समाधान मानून तो खेळात सहभागी झाला.*
*आणि जीवनाच्या खेळाचं अंग बनून राहिला.*
मित्रांनो चला आपल्यालाही आहे त्यात समाधानी राहून या जीवनाच्या खेळाचं अंग व्हायचे आहे.
सतत हसत खेळत रहा व जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या...
*Be positive and be happy...!
🙏🌹🙏